पॉप गायक जस्टीन बीबर व हैली बाल्डवीन या जोडीने नुकताच दिनांक 23 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला असुन त्यांनी त्याबाबत त्यांच्या इन्टांग्राम अकाउंटवर सदरची बातमी जाहीर केली आहे. जस्टीन याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “WELCOME HOME,” असे पोस्ट करुन त्याच्या मुलाचे स्वागत केले असुन मुलाचे नाव जॅक ब्ल्यु बीबर(Jack Blues Bieber) असे ठेवल्याचे जाहिर केले आहे.
https://www.instagram.com/p/C_CV7GLJBA3/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA
जस्टीन बीबर हा कॅनडात जन्मलेला पॉप – ऱ्हिदम अँड ब्लूज संगीतशैलीतील गायक आहे. त्याने पॉप गायनासोबत इंग्लिश भाषेतील दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतून अभिनयही केला आहे. बीबर याने त्याचे लहानपणीच पियानो,ड्रम्स,गिटार व ट्रम्पेट वाजविण्यात पारंगत झाला होता.सन 2012 मध्ये त्याने स्ट्रेटफ़ोर्ड, ओंटारियोच्या सेन्ट माइकल कैथोलिक सेकेन्डरी स्कूल मधुन पदवी घेतली. बीबर याचे सेलिना गोमेज़ हिच्याबरोबर प्रेमसंबंध होते. तर दिनांक 07 जुलै, 2018 मध्ये त्याने हैली बाल्डवीन या व्यवसायाने मॉडेल असलेल्या महिलेबरोबर लग्न केले. जस्टीन हा ‘बॉयफ्रेंड‘, ‘नेवर से नेवर’, ‘लव याॅरसेल्फ’, ‘ब्यूटी एण्ड द beat’, ‘कम्पनी’ ‘सॉरी’, ‘what डू यू मीन’, और ‘देस्पासीतो‘, इ. लोकप्रिय गाण्यांचा गायक आहे. जस्टीन याने नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी व राधा मर्चंट यांच्या लग्नामध्ये परफॉमन्स दिला होता.